Backpacking trip करायचं बरेच दिवस मनात होते. पण कधी, कुठे, कशी याचा कधीच विचार केला नव्हता. Backpackers चे बरेच ब्लॉग्स वाचनात आले होते आणि त्यातून आपणही कधीतरी unplanned ट्रीप करावी इतकाच विचार मनात होता. रोजच्या hectic routine मधून कसा वेळ काढणार होतो माहीत नव्हतं पण एक दिवस रात्री उशिरा असाच एक ब्लॉग वाचताना ठरवलं आणि त्यानंतरच्या तिसर्या दिवशी घरातून बाहेर पडलो देखील आणि ते पण उत्तराखंड मधील ऋषिकेश ला जाण्यासाठी..
खांद्यावर backpack.. त्यात 4-5 दिवसांचे कपडे.. आणि पुणे – दिल्ली रिटर्न airfare इतकीच तयारी होती..
दिल्लीत पहाटे लॅण्ड झालो आणि पटापट पुढचा प्लॅन केला.. बरं प्लॅन करताना एका गोष्टीचा कायम विचार करावा लागतो तो म्हणजे बजेट चा.. कारण कमीतकमी आणि ठरलेल्या बजेट मध्ये ट्रीप करणे ही एक कंडिशन backpacking मध्ये सर्वात महत्त्वाची असते. आणि मी ती पूर्णही केली. Challenges खूप आले पण त्यातील thrill मी enjoy करत होतो.. जसे की दिल्लीत पोहोचल्यावर Airport to bus stand जर तुम्ही 2 metro बदलून गेलात तर 50 रुपये होतात आणि cab वाले 500 रुपये घेतात.. पण station आणि route शोधून काढण्यात तेसुद्धा दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत खूप मस्त अनुभव देणारं होतं..

आजकाल मोबाईल apps मुळे life खूप easy zalay.. मी सुद्धा त्याचाच वापर करत आधी ऋषिकेश ला जाणार्या volvo चे आणि on the go हॉटेल चा रिसर्च करून zostel चे बूकिंग केले.
Zostel मधील माझा stay पहिल्या दिवशी इथे राहूच शकत नाही पासून चवथ्या दिवशी इथून निघूच नये पर्यंत बदलत गेला. त्याला कारणही तसेच होते.. होस्टेल पॅटर्न असल्यामुळे रोज नवीन लोक येत जात होते.. प्रत्येक जण आपला खास मित्र असल्याप्रमाणे गप्पा मारत होता.. तिथलं वातावरण.. Restaurant.. Activities.. Lounge.. Library सगळेच हटके होतं.. सर्व luxury विसरून टाकायला लावणारं होतं..
इथे तुम्ही bikes सुद्धा hire करू शकता.. काही तासांसाठी किंवा दिवसभरासाठी .. Activa पासून ते Harley Davidson पर्यंत सर्व पर्याय मिळतात.. Rates vary होतात .. पण नक्कीच अनुभवण्याची गोष्ट आहे .. मी पण hire केली एक दिवस आणि मनसोक्त निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करत, Photography करत मस्त दिवस घालवला..
ऋषिकेश मधील 4 दिवस हे मला खर्या अर्थाने माझे वाटत होते… काय काय केलं मी इथे.. चालत भटकलो भरपूर.. रोजचा 12-15 km वॉक सहज होत होता.. भारतातील सर्वोच्च अनुभव देणारं ganga river rafting केलं (that was indeed a lifetime experience).. ट्रेक केला.. कडाक्याच्या थंडीत पहाटे 4 वाजता उठून sunrise बघायला गेलो .. Cliff jump केलं आणि त्यातूनच गंगा स्नान केल्याचं पुण्यही कमावले ?.. रोज संध्याकाळी घाटावरील गंगा मातेची आरती तर खूपच relax फील देणारी होती ..आरतीनंतर लाऊडस्पीकर लावलेली भजने ऐकत काठावर बसुन गंगा वाहताना बघितली की इतके शेकडो साधू इथे काय करत असतिल या प्रश्नाचे उत्तर मिळते..
असाच एका संध्याकाळी गंगा तीरावर बसलो असता एक साधू शेजारी येऊन बसला.. आधी वाटलं याला काहीतरी अपेक्षित आहे माझ्याकडून.. मी थोडं दुर्लक्षच केलं.. तो बोलतच होता.. हळूहळू त्याचं बोलणं Interesting वाटू लागलं.. अतिशय उच्च हिंदी आणि इंग्रजी भाषेत बोलणं सुरू होतं.. एखाद्या motivational speaker ने बोलावं तसा तो बोलतच होता.. ती 20-25 मिनिटे फारच भन्नाट होती.. भारी वाटलं.. नंतर शेजारच्या चहा वाल्याकडून कळाले की ही व्यक्ती एका आश्रमात येणार्या foreigners ना योग शिकविते आणि साधारण 10-12 वर्षांपूर्वी परदेशात प्रोफेसर होते.. ऐकून थक्क झालो..
ऋषिकेश ला योगाची जागतिक राजधानी म्हणून पण ओळखले जाते.. ईथे अशी अनेक centers आहेत जिथे जाऊन तुम्ही Yoga आणि meditation चे authentic ज्ञान मिळवू शकता.. थोडक्यात काय तर ऋषिकेश ला जा.. अध्यात्म शिका.. Adventure अनुभवा .. Relax करा.. आणि Mentally detox व्हा..
गंगा मैय्या की जय ??

















