Loading...

News

डेरवण येथे साकारले आहे अद्ययावत क्रीडा संकुल

<br />
<b>Notice</b>:  Trying to access array offset on value of type bool in <b>/home1/cosmi4zz/aroundpune.com/wp-content/themes/aroundpune/single-blog.php</b> on line <b>131</b><br />
Aditi Khadilkar
Share
5 Min Read

‘डेरवण’ म्हटले कि डोळ्यासमोर येते ती शिवसृष्टी, पण ह्या डेरवणची नवी ओळख होऊ पाहते आहे ती ‘एसव्हीजेसिटी स्पोर्ट्स अॅकॅडमी’ ह्या नावाने. भारताची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उंचावली पाहिजे, खेळाडूंना सर्वोत्तम क्रीडासुविधा मिळाल्या पाहिजेत हा प्रत्येक ऑलीपिक्स नंतरचा सूर, हा सूर नुसताच न आळवता त्यादृष्टीने पुढचे पाऊल म्हणून ‘श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट’ने कोकणात चिपळूणजवळील कासारवाडी सावर्डे येथे अद्ययावत क्रीडा संकुल उभे केले आहे. कोकणातील दुर्गम भागात हे क्रीडासंकुल उभे करण्यामागे एकच उद्देश आहे कि खेड्यापाड्यातील गरीब, वंचित पण गुणवंत मुलांना खेळातून आरोग्यसंपन्न जीवनशैलीची ओळख करून देणे. त्यांच्यातील सुप्त गुण हेरून त्यांना आवडत्या खेळाचे प्रशिक्षण देणे. याचबरोबर त्यांच्यातील कौशल्य प्रगट करण्यासाठी त्यांना विविध स्पर्धामध्ये सहभागी करून राष्ट्रीय पातळीवर हे खेळाडू कसे पोहचतील यासाठी प्रयत्न करणे.

कोकण हा भाग पर्यटन, आंबे, यासाठी प्रसिध्द येथील मुले चपळ, काटक व लवचिक असतात. परंतु त्यांना खेळासाठी लागणारे अनुभवी आणि आधुनिक मार्गदर्शन हे या क्रीडासंकुलात देण्याची सुविधा आहे. ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक, त्यामध्येच असणारे हिरवेगार फुटबॉल मैदान, बॅडमिंटन handball volleyball आणि gymnastics या खेळांसाठी असणारा भव्य हॉल, २५ मीटरचा बंदिस्त स्विमिंग पूल आणि कबड्डी, खो-खो धनुर्विद्या आणि लंगडी या खेळांसाठी असणारे देशातील पहिले बंदिस्त मैदान हि या क्रीडासंकुलाची वैशिष्ट्ये आहेत. वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा तसेच नियमित चालणारी प्रशिक्षण शिबिरे यामुळे हे संकुल कायमच गजबजलेले असते. रत्नागिरी चिपळूण तसेच कोकणातील लहान गावातूनच नव्हे तर मुंबई, नाशिक औरंगाबाद येथूनहि खेळाडू येथे येतात.

शालेय वयातील नवोदित खेळाडूंना स्पर्धेचा अनुभव यावा त्यांना चांगली स्पर्धा अनुभवता यावी यासाठी क्रीडासंकुलात शिवजयंतीच्या अनुषंगाने ‘डेरवण युथ गेम्स’ चे आयोजन केले जाते. आठ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये १८ खेळांचा समावेश आहे ज्यामध्ये १० वर्षाखालील वयोगटातील ते १८ वर्षे वयोगटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना ऑलिम्पिक मेडलची आठवण करून देणारे मेडल, रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे दिली जातात. १ मार्च २०१५ ते ८ मार्च २०१५ मध्ये डेरवण युथ गेम्स हि स्पर्धा भरवली गेली तेव्हा १८८९ खेळाडूंनी आपला सहभाग नोदवला होता. स्पर्धेचे हे ५ वे वर्ष होते त्यामध्ये १६ मार्च २०१९ ते २३ मार्च २०१९ या कालावधीत ४००० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. खेळाडूच्या बरोबर असलेले प्रशिक्षक, पालक प्रेक्षक अश्या ७००० हून अधिक लोकांनी क्रीडानगरीला भेट दिली. शालेय खेळाडूंसाठी जणू मिनी ऑलिम्पिक असलेल्या या स्पर्धेत यंदा १८ खेळ चुरशीने खेळले गेले. अॅथलॅटिक्स, आर्चरी, फुटबॉल, रायफल आणि पिस्तोल शुटींग, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स, बॅडमिंटन, योगा, जलतरण, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, मल्लखाब, लंगडी आणि स्पोर्ट्स क्लाईबिंग ह्या सर्व खेळामध्ये रत्नागिरी ,चिपळूण, कोकणातील लहान-लहान गावे ,सातारा, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, पूणे, मुंबई नाशिक, औरंगाबाद, शेगाव येथील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. स्वच्छता अद्ययावत क्रीडासाधने अत्यंत नम्र व कोणत्याही मदतीसाठी तयार असणारे स्वयंसेवक यामुळे आलेला प्रेक्षक खेळाडू व प्रशिक्षक भारावून गेला नाही तर नवलच. आलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांची निवासव्यवस्था हि विनामूल्य आणि अंत्यत नाममात्र शुल्कात उत्तम भोजनाची सोय केली जाते. थोड्या थोड्या अंतरावर ठेवलेल्या कचरापेट्या उपस्थितांना स्वच्छता आणि स्वयाशिस्त ठेविण्यासाठी प्रेरित करतात.

दोन वेळेला जेवायची भ्रात असलेले, अनवाणी पळणारे तरी पण ध्येय साध्य करण्यासाठी जीवतोड मेहनत करणाऱ्या खेळाडूंसाठी हि सुवर्ण संधीच असते. स्पर्धेसाठी लाब-लांबून प्रवास करून आलेले खेळाडू पहिले कि या स्पर्धेमुळे महाराष्टातील क्रीडा वैभवाला पैलू पाडण्यासाठी अश्या स्पर्धा पाहिजेत हे जाणवते.  .उत्तम साधने ,प्रशिक्षण, आहार, speed, technique, strength ह्या त्रिसूत्रीचे महत्व पटवून देण्यासाठी येथे ‘क्रीडा प्रेरणा व्यासपीठ’ हा कार्यक्रमही चालतो. ज्यामध्ये अनेक नामवंत खेळाडूंची मुलाखत त्यांच्या जीवनपटाबरोबरच घेतली जाते.

तरुण व आश्वासक खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण व तंत्रशुद्ध सराव येथे देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवणे. ग्रामीण व दुर्गम भागातील गुण हेरून त्यांना svjct मधील आंतरराष्ट्रीय दर्जाची साधने उपलब्ध करून देणे हे संस्थेचे ध्येय आहे. ह्या ध्येयाचा चिकाटीने केलेला पाठपुरावा केला गेला. त्याचे फळ  म्हणून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केली आहे .

याच क्रीडासंकुलात सराव करणाऱ्या ‘ईशा पवार’ या गुणवंत खेळाडूने साउथ एशियन गेम्स या आंतराष्ट्रीय स्पर्धेत तसेच खेलो इंडियामध्ये दोनवेळा सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. रिया पाकळे, मृणाल  सपकाळ यांनीहि राष्ट्रीय स्तरावर आर्चरीसाठी यश मिळवले. प्रेमसागर चव्हाण, यज्ञीत वारे, श्रावणी वालावकर हे राष्ट्रीय स्तरावरचे जलतरणपटू, स्वरा गुजर हिने योगासन, तर निहाल विचारे, तेजस धनावडे यांनी  मल्लखांबसाठी राष्ट्रीय पदक जिंकले आहे.

या स्पर्धेची संकल्पना मूर्त रुपात आणणारे संस्थेचे प्रमुख विश्वस्त अशोक रघुनाथ जोशी हे नेहमी सांगतात कि यश व अपयश समान भावनेने स्वीकारले कि खेळाडू वृत्ती जागृत होते. हीच जिगरबाज खेळाडू वृत्ती सर्वामध्ये संघभावना आणि त्याचबरोबर राष्ट्रीय भावना जागृत करते. खेळाच्या मैदानावर केवळ एक संघ घडत नाही तर निरोगी समाज घडतो असेही ते सांगतात. या स्पर्धेचे नियोजन पेलणारे विश्वस्त विकास वालावलकर हे स्पर्धेच्या यशाचे श्रेय हे मुंबई पुणे आणि अन्य ठिकाणाहून आपला नोकरी धंदा सोडून येणाऱ्या स्वयंसेवकांना देतात.

लाब लाबून आलेले लहान मोठे खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक ह्या सर्वांच्या मेहनतीला दाद म्हणून हा लेखनप्रपंच. ५ मार्च २०२० साली होणाऱ्या या स्पर्धेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे साक्षीदार होण्यासाठी हे आवाहन.

Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments