Loading...

Blogs

आनंदाची फेरी

Shilpa Ingle
Share
3 Min Read
धुंद करणारा हा वारा, माझ्यासोबत निसर्ग सारा…

प्रत्येक आठवणीत कुठलातरी प्रसंग असतो आठवत…
आणि प्रत्येक प्रसंगात आपण असतो काहीतरी साठवत…

प्रसंग होता नुकताच केलेला दाभोळ – गुहागर हा फेरी बोटीचा प्रवास..

कोकणातील हिरव्यागार निसर्गामध्ये एक निळीशार पाण्याची वाट त्यावर स्वार ही मानवनिर्मित तरंगत असलेली  फेरी बोट मनाला वेगळाच आनंद देते.

आठ-दहा मिनिटांचा हा प्रवास.. लाटांवर स्वार होऊन ही फेरी बोट अवजड वाहनांना त्यांच्या मालकासहित एका तीराहून दुसर्‍या तीरावर सहज पोहोचवते.

कोकणातून प्रवास करताना लाँग डिस्टन्स शॉर्ट करायचं असेल तर फेरीबोटीने प्रवास करणे नक्कीच फायद्याचे ठरते.दापोलीहून-गुहागरला जायचं असेल तर दाभोळ-धोपावे मार्गे फेरीबोटीने जाता येते. तसेच कोकणात अलिबाग, वेळणेश्वर, आंजर्ले, दापोली व इतर ठिकाणी सुद्धा फेरी उपलब्ध आहे.

सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन कार्पोरेशन सर्विसेसच्या फेरीबोटीने आगरदंडा-दिघी, वेसवी-बागमांडले, दाभोळ-धोपावे, जयगड-तवसाळ ह्या सेवा उपलब्ध आहेत. रात्री 10 ला शेवटची फेरी आहे. दहानंतर फेरीने जायचे असेल तर ज्यादा आकार साधारण रुपये 300 व प्रत्येकी भाडे या प्रमाणे सुविधेचा लाभ घेता येईल.

या फेरीमुळे कोकणात प्रवास करताना पाचशे किलोमीटरचा प्रवास अवघ्या अडीचशे किलोमीटर मध्ये होऊ शकतो. ह्या सेवेमुळे कोकणातील कमीत कमी दोन पर्यटन स्थळांना आपण एका दिवसात आरामात भेट देऊ शकतो.

या फेरीचे भाडे अगदी  सामान्यांना परवडणारे असून कोकण वासी या सेवेचा  एका गावातून दुसऱ्या गावात जायला नियमितपणे वापर करतात.

ताजा-तवाना करणारा गार वारा अनुभवताना मी दुसर्‍या तीरावर कधी पोहोचले हे कळलेच नाही.. अशा छोट्या छोट्या प्रसंगातून आपण आनंद साठवत जातो आणि यालाच तर प्रवास म्हणतात.

घेऊन मजला निघाली ही फेरी, पोहोचवण्या किनारी ।
चौकटीत सामावलेले देखणे निसर्गाचे रूप
जरी असशील लांब तू … तरीही दृष्टिक्षेपात तू
आता, दापोली ते गुहागर फेरीच्या संयोगाद्वारे प्रवास करणे खूप सोयीस्कर आहे.
बांधले मी, तुझ्या उरी।
रात्री 10 ला शेवटची फेरी
ही फेरबोट सेवा सतत व्यस्त आहे आणि प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ही सेवा चालू ठेवली आहे.
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments